Shop Description:
India’s first ever “Self-Propelled Electric Agricultural Tool Bar” (Krishigati Electric Bull). Krishigati’s goal is to make farming easier, less expensive, and more rewarding for small-scale farmers with unique products and services offerings.
M/s Krishigati Helping farmers save 20 to 70% on operational cost, Contribute to SDG-2.3, 2x farmer productivity & income, Catalyst for SDG-13 climate-resilient agriculture mechanization and Inclusive ESG for next-gen Agri Tech Solution to the marginal farmers at global level.
स्वयंचलित विद्दुत अग्रीकल्चर टूल बार यंत्र फायदे व कामे
फायदे -
- एक मशीन, अनेक कामे
- एका वेळेस दोन कामे करता येणे शक्य ( उदा फवारणी , आणि कोळपणी.)
- इलेक्ट्रिक असणे आणि पर्यावरण अनुकूल.
- १८ वर्ष वरील सर्व वयोगटातील वापरकर्त्यांसाठी ऑपरेट करणे सोपे.
- पारंपारिक उपकरणांपेक्षा अधिक प्रभावी.
- लहान, मध्यम आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडणारे.
- विविध सेन्सर्ससह IoT Features & एफएम रेडिओ देखील उपलब्ध आहे.
- उत्पन्न लागत खर्चात ६० ते ८० टक्के बचत
कामे -
(१) पेरणी – पेरणीची कामे या यंत्राद्वारे सहज शक्य आहेत. वेगवेगळ्या पिकांसाठी दोन बियांमधील अंतर आणि खोली वेगवेगळी असते. अशा परिस्थितीत या यंत्रातील सीड ड्रिलच्या साहाय्याने शेतकरी त्यांच्या गरजेनुसार बियाण्यांमधील अंतर ठरवू शकतात. शिवाय, बियांचा आकार लहान किंवा मोठा असल्यास आकारानुसार वेगवेगळ्या आकाराच्या 6", 8" आणि 12" चकती वापरून पेरता येते. ठराविक अंतरावर बियाणे पेरल्यास झाडे पुरेशी वाढू शकतात., भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा, परिणामी पिकाची जोमदार वाढ होते.
(२) तण काढणे – शेतीचे उत्पादन वाढवायचे असेल तर तणांचे नियंत्रण करणे हे काम होते. ई-बुल 12" आणि 24" अशा दोन प्रकारच्या विडिंग ब्लेडने सुसज्ज आहे. हे ब्लेड जमिनीत 3" ते 4" खोल जाऊ शकतात, ज्यामुळे तण उपटणे शक्य होते. यासोबतच जमिनीची मशागत केली जाते त्यामुळे मुळापासून तण काढून टाकल्यामुळे तणनाशकांसारख्या रसायनांची गरज भासत नाही आणि जमिनीचा पोत व सुपीकता टिकून राहते.
(3) माती लावणे -- पिकांच्या निरोगी आणि जोमदार वाढीसाठी माती मशागत करणे महत्वाचे आहे. माती आच्छादनामुळे मुळांना ऑक्सिजन मिळतो, माती निरोगी राहते आणि मातीची परिसंस्था अधिक चांगल्या प्रकारे कार्य करते. या यंत्राला जोडलेले अर्थ-अप ब्लेड माती वर-खाली हलवण्यास आणि पिकाची मशागत करण्यास सक्षम आहे. या मशीनची एकंदर प्रणाली बैल जोडीच्या बरोबरीने काम करते.
(4) फवारणी करणे - सामान्यत: हवामान बदलामुळे पिकांवर रोग, वाढ खुंटते, कीड होते. योग्य वेळी फवारणी हा प्राथमिक उपाय मानला जातो. कृषी इलेक्ट्रिक बुल एचपीटी लान्स आणि ब्रूम स्प्रेअरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये पाच ते सहा छिद्रे (नोझल) आहेत. पिकांची उंची आणि दोन ओळींमधील अंतर यानुसार या फवारणी यंत्राची उंची व दिशा बदलता येते. हे मशीन 75 लिटर क्षमतेच्या टाकीसह सुसज्ज आहे. यंत्राची फवारणी क्षमता 18 मिनिटांत अर्धा एकर आणि 36 मिनिटांत एक एकर आहे.
सर्व प्रमुख कामे जसे कि फवारणी, वखरणी, कोळपणी, पेरणी या कामासाठी इलेक्ट्रिक बुल उत्तम पर्याय आहे. सोयाबीन, हरभरा,मका कॉटन, भाजीपाला, मिरची ,या पिकांमध्ये वेळेवर लेबर न मिळाल्याने जे नुकसान होते ते स्वयंचलित विद्दुत अग्रीकल्चर टूल बार हे यंत्र वापरल्याने खर्चाची बचत होण्यास आणि उत्पादन वाढीस मदत होते.